UPSC Civil Services (Main) Examination 2026 — Marathi Literature Paper II: Question Paper | Plutus IAS

UPSC Civil Services (Main) Examination 2026 — Marathi Literature Paper II: Question Paper | Plutus IAS

The questions below are from Marathi Literature Paper II of UPSC Civil Services (Main) Examination 2026 (held 2026-08-30) — the actual paper, which is public government content. This page carries the questions for reference and revision; model answers for this paper are not published here.

Official paper (PDF): upsc.gov.in.

  1. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा : 10×5=50 – (a) माहादाइ-वोवीया-गायेन-श्रवणि रूपैची सीध (द) वाणि म्हणणे : ॥ : एकु दीसु महादाइसी काइसेया प्रकरणावरुनि वोविया गाइलीया : तें नेणीजें : । : महादाइसी म्हणितलें : नागदेवाचेया खांदावरी करु : राजा चक्रधरु : बीजें करी : ॥१॥ सोनेसळा सेला : नेसला मालगटीं : म्हाइया आला भेटी : प्रभूचीये : ॥२॥ – (b) तशांत पर्जन्याची अनावृष्टि झाल्यावरून पडलेल्या दुष्काळांत चारापाण्यावांचून लक्षावधि बैलांचा सरसकटीने खप होऊन त्यांचे वाटोळें झालें. – (c) “स्वतःच्या प्रयत्नाने माझे लग्न जुळविण्याची खटपट फारशी करता आली नाही. तशी खटपट करावयाची म्हणजे चोरून तरुणांच्या भेटी घेणे इत्यादी क्रिया कराव्या लागल्या असत्या, पण त्या शक्य झाल्या नाहीत. आमचे बाबा जरी सुधारक म्हणवीत होते तरी स्त्री-पुरुषांचा मोकळा व्यवहार असावा याच्या ते विरुद्धच होते.” – (d) निंदणं-खुरपण्याच्या मोसमात लई करून गडी व काही बाया मिळून खुरपण्याचे गुते घेतासत व माणसं व बाया बरोबरीनेच निंदीत असूनही माणसाला बाईच्या डबल दाणे देतासत व बायाला माणसाच्या निम्मे दाणे देतासत. – (e) “पुरुष बहुधा मठ असतातच, पण आता इतक्या बाया पाहून मला तर वाटायला लागलंय की त्यांच्याशी संसार करायला मठ पुरुषच हवेत!
  2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : – (a) ‘स्मृतिस्थळ’ या ग्रंथाच्या आधारे महानुभाव संप्रदायाच्या तत्त्वज्ञान आणि आचारधर्माची कोणती वैशिष्ट्ये अधोरेखित होतात, ते स्पष्ट करा. 15 – (b) ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथातून महात्मा फुले यांचे नवसमाज निर्मितीचे विचारसूत्र कसे प्रकट झाले आहे, ते सोदाहरण लिहा. 15 – (c) “समाजप्रबोधनाचे कार्य यशस्वीपणे पार पाडणाऱ्या ‘ब्राह्मणकन्या’ या कादंबरीचा आकृतिबंध मनावर पकड घेणारा आहे.” या विधानाची विस्तृत चर्चा करा. 20
  3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : – (a) ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकाच्या भाषिक आणि अभाषिक घटकांची सोदाहरण चर्चा करा. 15 – (b) ‘शिळान’ कथासंग्रहात कृषिसंस्कृतीवर आधारित मानवी जीवनाचे प्रतिबिंब कसे उमटले आहे, ते स्पष्ट करा. 15 – (c) ‘बाबुराव बागूल’ यांच्या ‘जेव्हा मी जात चोरली होती!’ या कथासंग्रहातून वेदना, विद्रोह आणि नकार यांचे दर्शन कसे घडते, ते स्पष्ट करा. 20
  4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : – (a) “शरचंद्र मुक्तिबोध यांच्या ‘जन हे वोळतु जेथे’ या कादंबरीतून ‘मानुषता’ या संकल्पनेचे प्रगटीकरण प्रत्ययकारीरित्या झाले आहे”, कसे ते सोदाहरण लिहा. 15 – (b) “प्र. ई. सोनकांबळे यांच्या ‘आठवणींचे पक्षी’ या आत्मकथनाचे लेखन म्हणजे बाल व युवा अवस्थेतील अनुभवजन्य जाणिवांचे चित्रण आहे”, याची चर्चा करा. 15 – (c) “गौरी देशपांडे यांच्या ‘एकेक पान गळावया’ मध्ये स्त्री-पुरुष संघर्षाचे प्रभावी दर्शन घडते.” या विधानाचा परामर्श घ्या. 20
  5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : (a) “बुद्धी आणि भावना यांचा सुरेख संगम नामदेवांच्या अभंगवाणीत अनुभवास येतो”, या विधानाचे विश्लेषण करा. 15 (b) “शृंगार रस आणि वीररस ही शाहिरी कवितेची बलस्थाने होत”, कसे ते ‘पैजण’च्या आधारे स्पष्ट करा. 15 (c) ‘आख्यानकाव्या’ची गुणवैशिष्ट्ये सांगून ‘दमयंती-स्वयंवर’त ती कशी दिसून येतात, ते विशद करा. 20
  6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : (a) बालकवींच्या काव्याच्या भाषाशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. 15 (b) कवी कुसुमाग्रजांना ‘प्रकाश पूजक कवी’ असे का म्हटले जाते, ते ‘विशाखा’ कवितासंग्रहाच्या आधारे लिहा. 15 (c) “महानगरातील समाजवास्तव हा नारायण सुर्वे यांच्या कवितेचा गाभा आहे”, हे विधान ‘जाहिरनामा’तील कवितांच्या आधारे उलगडून दाखवा. 20
  7. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : (a) ‘मुक्तछंद हे छंदोबद्धच काव्य असते’, हे विधान कवी ग्रेस यांच्या ‘संध्याकाळच्या कविता’ या काव्यसंग्रहातून कसे प्रत्ययास येते ते लिहा. 15 (b) ‘या सत्तेत जीव रमत नाही’ या संग्रहातील कविता नामदेव ढसाळ यांची समाजनिष्ठा आणि कवीची अंतर्मुखता याविषयीचे चिंतन व्यक्त करते, कसे ते सांगा. 15 (c) ‘मृदगंध’ मधील सामाजिक आणि प्रेमानुभव व्यक्त करणाऱ्या कवितांचा परिचय करून द्या. 20 SB27-30

Questions reproduced from the official paper for study purposes; verify on the exam-conducting body’s official website.


Related — other papers of this exam

No Comments

Post A Comment