11 Sep UPSC Civil Services (Main) Examination 2026 — Marathi (Compulsory): Question Paper | Plutus IAS
The questions below are from Marathi (Compulsory) of UPSC Civil Services (Main) Examination 2026 (held 2026-08-29) — the actual paper, which is public government content. This page carries the questions for reference and revision; model answers for this paper are not published here.
Official paper (PDF): upsc.gov.in.
- पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर 600 शब्दांत निबंध लिहा. (a) प्रबुद्ध भारत ची संकल्पना आणि आपले भवितव्य (b) डिजिटल युगात नागरिकांची कर्तव्ये (c) भारतात अंतराळ (अंतरिक्ष) संशोधन आणि मंगळयान (d) आरोग्यसेवेच्या सोयी आणि गुणवत्ता
- पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि उताऱ्याच्या शेवटी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सुस्पष्ट, योग्य व संक्षिप्त भाषेत लिहा. 12×5=60 दुःखाच्या निर्मितीला भीती जितकी कारणीभूत असते, तितकेच महत्त्वाचे स्थान आनंदात उत्साहाला असते. ज्या कामात कष्ट आणि हानी सहन करण्याची अपेक्षा असते, त्या कामात सर्वांसाठी उत्कंठावर्धक आनंदही अंतर्भूत असतो. कष्ट किंवा हानी च्या भेदानुसार उत्साहात मध्ये पण भेद होतो. साहित्य मीमांसकांनी याचदृष्टीने युद्धवीर, दानवीर, दयावीर, इत्यादी भेद केले आहेत. त्यात युद्धवीरता सर्वाधिक प्राचीन व महत्त्वाची मानली जाते, कारण त्यात आघाताची, दुःखाची इतकेच नव्हे तर मृत्युची सुद्धा पर्वा केली जात नाही. वीरतेत धाडस आणि प्रयत्न यांचा परमोत्कर्ष झालेला असल्याने प्राचीन काळापासून वीरतेला प्राधान्य दिले जाते. पण केवळ कष्ट आणि दुःख सहन करण्याची क्षमता असून चालत नाही. तर अत्यंत आनंदाने, उत्साहाने केलेला प्रयत्न प्रयत्नाचा योग पाहिजे. बेशुद्ध झाल्याशिवाय भारी फोडाला चिरा घेण्याला तैयार होणे साहस म्हटले जाईल, उत्साह नव्हे. त्याचप्रमाणे हातापायाची हालचाल न करता असह्य आघात सहन करीत जागेवरून न हालणे याला धाडस म्हणता येईल, पण आनंदाने, उत्साहाने सामोरे जाण्याला धैर्य आणि धाडस म्हणता येईल. सारांश केवळ निचेष्ट राहूण कष्ट सहन करण्यात नव्हे; तर आनंदाने उत्कंठापूर्वक केलेल्या कामात उत्साहाचे दर्शन घडते. धैर्य आणि साहस या दोन्हींचा अंतर्भाव उत्साहात होतो. दानवीर च्या अर्थ त्यागाचे साहस अर्थात त्याच्या मुळे होणाऱ्या कष्ट किंवा त्रासाला सहन करण्याची क्षमता त्यात अंतर्भूत असते. दानवीरता तेव्हाच म्हटली जाईल, जेव्हा दानवीराला दाना मुळे आपल्या जीवन निर्वाहात कुठल्या प्रकारा चे कष्ट किंवा त्रास दिसतील. याच कष्ट आणि त्रासा ची मात्रा किंवा शक्यता जेवढी जास्त असेल दानवीरता तितकीच ऊंच समजली जाईल. पण या अर्थ त्यागा च्या साहस सोबत, जो पर्यंत पूर्ण तत्परता आणि आनंदा ची चिन्ह दिसणार नाही, तो पर्यंत उत्साह प्रत्ययाला नाही येणार. जीवनात युद्धाव्यतिरिक्त शारीरिक कष्ट, प्राणहानी सारखे बिकट प्रसंग सहन करावे लागतात. संशोधनात निसरडया, अभेद, अगम्य पर्वतावर चढाई करावी लागते. बर्फाळ ध्रुवप्रदेशात, वैराण वाळवंटात भ्रमंती करावी लागते. तसेच क्रूर, अमानवी जातीच्या सहवासात, घनघोर निबिडे अरण्यात वावरतांना धाडस आणि शौर्य दाखवावे लागते, यात आनंद मानणाऱ्या लोकांत उत्साहाची प्रचिती येते. – (a) साहसात उत्साहाला किती महत्त्व असते, ते स्पष्ट करा. 12 – (b) धैर्य म्हणजे काय ? 12 – (c) उत्साहाचे खरे दर्शन कशाप्रकारे होते ? 12 – (d) आनंददायक तत्परता आणि उत्साह यांमधील अंतर्संबंध उलगडून सांगा. 12 – (e) दानशूराला दान दिल्याने कोणत्या यातना सहन कराव्या लागतात ? 12
- पुढील उताऱ्याचे इंग्रजीत भाषांतर करा. जहाज चालवण्याच्या कौशल्याबद्दल भारतीय नाविकांचा लौकिक प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. 5000 वर्षा त्यांनी समुद्रात नौकानयन करण्यास सुरुवात केली होती. त्या काळात समुद्रप्रवासाची अत्यल्प यंत्रे उपलब्ध होती. आजच्यासारखी अत्याधुनिक साधनसामुग्री त्या काळात नव्हती. पण प्राचीन नाविकांची ज्ञानेंद्रिये इतकी तेजपुंज होती की, त्यांना हवामानाचा अचूक अंदाज बांधता येत होता. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीगतीवरून ते हवामानाचा अंदाज करीत. समुद्राच्या पाण्याच्या रंगावरून ते पाण्याच्या खोलीचा अंदाज बांधत. समुद्री जीवजंतुंच्या अस्तित्वावरून ते जमीनीचे अंतर शोधत असे. इतकेच नाही तर काही वेळा तर ते एखाद्या देशाचा मार्ग सहजपणे काढत. त्या काळात सामुद्रिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था नव्हत्या, अनुभव-निरीक्षण आणि चूकांमधून शिकणे ह्याच त्यांच्या पाठशाळा होत्या. प्रवासात कधी-कधी दुर्घटना घडत असतील, पण त्यांचे शौर्य आणि आत्मविश्वास त्यांना समुद्रप्रवासासाठी प्रेरणा देत होता. याच आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी पश्चिमेची फारस खाडी, अफ्रिकेचा पूर्वकिनारी प्रदेश, तसेच पूर्व इंडोनेशिया, कंबोडिया, अन्गाम, बोर्नियो आणि सेलीबीज सारख्या अज्ञात द्वीपांपर्यंत जाण्यात ते यशस्वी झाले होते. सामुद्रिक प्रशिक्षण देण्याची आधुनिक प्रणालीचा आरंभ 1920 च्या पहिल्या दशकात झाला. स्वातंत्र्यानंतर भारतात परिवर्तनाची सुखद लहर वाहू लागली. भारताच्या गौरवशाली नौकानयन सूर्याचा अंत काही वर्षांपूर्वी झाला होता, त्याचा पुन्हा एकदा नवा उदय होऊन तो चकाकू लागला आहे. भारतीय जहाजविश्व आज पुन्हा एकदा योग्य दिशेने वाटचाल करण्यात अग्रेसर झाले आहे.
- पुढील उताऱ्याचे मराठीत भाषांतर करा. Orientation for entrepreneurship has to start right from the schools. In schools, teachers need to highlight the role of entrepreneurship in national development. During college, students must be exposed to business development opportunities and must be trained towards the creation of new enterprises. Parents should encourage their children to take up new ventures after their education. We should cultivate a mindset that 'Idea is wealth'. The government must create a facilitating environment for the provision of venture capital for innovative ideas without collateral security. Universities and engineering and management institutions should work with banks and other funding agencies towards simplifying procedures for setting up businesses and working with entrepreneurs till the project becomes self-sustaining and viable. Procedures in government should facilitate the spotting and recognition of new Indian talent in entrepreneurship by creating a level playing field for healthy competition. Citizens who can afford it should turn themselves into angel investors or start venture capital organizations to fund such new ventures. Big and small industries need to have an open mind in order to encourage and partner with young entrepreneurs.
- (a) पुढील वाक्प्रचारांचा/म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 2×5=10 – (i) हाडाची काडे करणे 2 – (ii) नाकाला मिरच्या झोंबणे 2 – (iii) तोंडसुख घेणे 2 – (iv) दात कोरून पोट भरणे 2 – (v) बारशाला गेला आणि तेराव्याला आला 2 (b) खाली दिलेल्या कल्पनांचा 10 वाक्यात विस्तार करा. 5×2=10 – (i) श्रम हाच धर्म 5 – (ii) आणि किल्ला बोलू लागला 5 (c) खाली दिलेल्या विषयावर 20 वाक्याचा संवाद लिहा. मासळीबाजार (d) पुढे दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. $1 \times 5 = 5$ (i) उत्कंठा (ii) खुशमस्करी (iii) त्राता (iv) दवंडी (v) परिभ्रमण (e) पुढे दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. $1 \times 5 = 5$ (i) चित्रदर्शी (ii) सहृदय (iii) घुमा (iv) शाश्वत (v) वरदहस्त
Questions reproduced from the official paper for study purposes; verify on the exam-conducting body’s official website.
- UPSC Civil Services (Main) Examination 2026 — Odia (Compulsory): Question Paper | Plutus IAS - September 11, 2026
- UPSC Civil Services (Main) Examination 2026 — Nepali (Compulsory): Question Paper | Plutus IAS - September 11, 2026
- UPSC Civil Services (Main) Examination 2026 — Marathi (Compulsory): Question Paper | Plutus IAS - September 11, 2026

No Comments